यानंतर, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया यासारखे कार्यक्रम देशाच्या आर्थिक संरचनेमध्ये कसे कायापालट घडवून आणत आहेत ते त्यांनी सांगितले. प्रगतीच्या दिशेने एकत्रितपणे टाकलेली ही पावले देशाला एक असा समाज बनण्यास मदत करत आहेत जो ज्ञानावर आधारित, कौशल्याचे पाठबळ असलेला आणि तंत्रज्ञानाद्वारे प्रेरित आहे.
जागतिक समुदाय तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी सहकार्य वाढविण्याकरिता भारत वचनबद्ध आहे अशी पंतप्रधानांनी सहभागी सदस्यांना ग्वाही दिली. झियामेन या सुंदर शहरात झालेले हार्दिक स्वागत व आदरातिथ्य याबद्दल त्यांनी चीनच्या अध्यक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
#-------------------------#
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील फेरबदल पूर्ण केले आहेत. निर्मला सीतारामन यांनी पूर्णवेळ संरक्षणमंत्री म्हणून काम करणारी पहिली महिला बनणे आणि ऑलिम्पिक रौप्यपदक पदक विजेते राज्यवर्धनसिंग राठोड यांनी क्रीडामंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून पदभार स्वीकारणे हे यातील काही प्रेरणादायी बदल आहेत. निर्मला सीतारामन मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते तर आई गृहिणी होत्या. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्यानंतर भारत-युरोपियन वस्त्र-उद्योग विषयामध्ये पीएचडी केली. प्रणव या हैदराबादमधील शाळेच्या संस्थापक संचालकांपैकी त्या एक आहे. 2003 - 2005 पर्यंत त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या होत्या. 2014 मध्ये त्यांनी वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभारी, या नात्याने पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळात फेरबदल होण्यापूर्वी त्या अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रमुख (राज्यमंत्री) होत्या. रौप्यपदक विजेते नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड, ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक रौप्यपदक मिळवणारे पहिले भारतीय, हे आतापर्यंत माहिती व प्रसारण राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले राठोड राष्ट्रीय संरक्षण अकादमीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि ते भारतीय भूदल सैन्यात दाखल झाले.
त्यांच्या पथकामध्ये या मोठ्या सुधारणा करताना पंतप्रधानांनी चार मंत्र्यांना कॅबिनेट दर्जामध्ये पदोन्नती दिली आहे आणि नऊ नवीन चेहरे राज्यमंत्री म्हणून आणले आहेत.
वीजेचे प्रभारी पीयूष गोयल यांना पदोन्नती देण्यात आली असून कोळसा मंत्रालयातील त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओसह रेल्वेचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. आणखी एक ज्येष्ठ मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कॅबिनेट दर्जा मध्ये पदोन्नती देण्यात आली असून पेट्रोलियम मंत्रालयातील त्यांच्या विद्यमान कार्याभाराबरोबरच त्यांच्याकडे कौशल्य विकास मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे.
पदार्पण करणाऱ्या नवीन चेहर्यांबद्दल संक्षिप्त माहिती:
#-------------------------#
दोन देशांमधील अधिक समावेशक सहकार्याचा मूर्त आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या द्विपक्षीय दौर्यासाठी म्यानमारमधील नाय पाय तावर पोहोचले.
भारत आणि म्यानमार क्षेत्रीय उपक्रमांमध्ये पुढाकार घेत आहेत, जसे की बंगालचा उपसागर बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकारिता उपक्रम (बिम्सटेक). गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोवा बिम्सटेक शिखर परिषदेने संक्रमण करार एकत्रीकरण आणि मुदतीत मुक्त व्यापार करार (एफटीए) यांचे महत्त्व अधोरेखित केले. बिमस्टेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची प्रारंभिक परिषद यावर्षी मार्चमध्ये पार पडली. ताज्या घडामोडींच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी आणि म्यानमारमधील त्यांच्या सहकार्यांनी प्रादेशिक सुरक्षाविषयक बाबींवर सहकार्य करण्यासाठी समकालीन उपाययोजनांचा शोध घेतला.
पंतप्रधान मोदींच्या म्यानमार दौर्यावरील काही महत्त्वाच्या घडामोडी:
म्यानमारमधील भारतीय वंशाच्या रहिवाशांसाठी पंतप्रधानांचा संदेश
आपण केवळ भारत बदलतच नाही आहोत तर एक नवीन भारत घडवत आहोत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
https://www.youtube.com/watch?v=ITUa8PLZ8tI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या भेटीपूर्वीच भारतीय समुदायांशी संपर्क साधून, नरेंद्र मोदी मोबाईल अॅपद्वारे आपली माहिती पाठविण्याची त्यांना विनंती केली आहे. त्यांना बर्याच विधायक सूचना मिळाल्या, त्या सूचनांच्या आधारे, भारतीय वंशाच्या तेथील रहिवाशांसाठी भारत सरकारने घेतलेल्या विविध उपायांबद्दल माहिती त्यांनी दिली.आदरणीय मोदीजी बर्याच नवीन सुधारणांनंतरही मला वाटते की संपूर्ण भारतामध्ये उच्च महामार्ग आणि शहरांमधील रस्ते या दोन्हीवर कोणतीही शक्तिशाली पावले उचलली गेली नाहीत. मग ती मेट्रो असो किंवा टियर 2 शहरे असोत. रस्ते लोकांना जोडतात पण मला वाटते सध्या ते भारताचे फक्त विभाजन करत आहेत; एक खूप मोठी दरी आहे जी भरून काढण्याची आवश्यकता आहे. भारतातील रस्त्यांचा संपूर्ण कायापालट होईल अशी आशा आहे ... डांबर वापरण्याऐवजी सिमेंटचे रस्ते बनविले जावेत ... प्रत्येक देशाची पारख तेथील रस्ते आणि पायाभूत सुविधा यांतून केली जाते ... स्वच्छ भारत अभियानानंतर ... मोदीजींनी स्वच्छ आणि भक्कम रस्त्यांसाठी मोहीम चालवावी ... स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिका अजूनही बरेच छुपे कारभार करत आहेत, ते योग्य प्रकारचे साहित्य वापरत नाहीत आणि एका पावसात रस्ते उखडले जातात. अशा लोकांवर कडक नजर ठेवायची , तसेच जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या आणि असे दयनीय दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या लोकांचे लायसेन्स रद्द करण्याची वेळ आली आहे. मी मोदीजी आणि रोड मिनिस्टर नितीन गडकरीजी यांना विनंती करतो की त्यांनी एक मोठे अभियान सुरू करावे आणि सर्व रस्त्यांमध्ये सुधारणा घडवून आणावी ज्यामुळे संपूर्ण भारतभर मोठा परिणाम होऊ शकेल. आपल्या देशाला स्वाभिमानी बनवा.. देश चालतो आणि धावतो त्याच्या रस्त्यांवर .. त्याला सर्वशक्तिमान आणि यशस्वी बनविण्यासाठी. साभार